पुणे । महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातून जशी मागणी असेल त्याप्रमाणे पाठवले जाते. महापालिकेत संगणकाद्वारे काम सुरू झाले त्यावेळी महापालिकेच्या बहुसंख्य कर्मचार्यांना संगणकावर काम करता येत नव्हते. त्यामुळे या कर्मचार्यांनी उपयुक्तता जास्त होती. त्यानंतर महापालिकेचे बहुतेक कायम कर्मचारी संगणक ऑपरेटिंग शिकले. त्यामुळे या कर्मचार्यांची गरज संपली. मात्र त्यांना काम मिळावे यासाठी त्यांची नियुक्ती तशीच ठेवली गेली.
महापालिकेच्या कामाचा व्यापही वाढत गेल्यामुळे या कर्मचार्यांना कामही होते. मात्र आता प्रशासकीय खर्चही वाढत असल्यामुळे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीपासून कंत्राटी कामगारांना कमी करणे सुरू केले आहे. 1 हजार 800 सुरक्षा रक्षकांपैकी 900 सुरक्षा रक्षकांना कमी करण्यात आले. त्यानंतर आता स्मार्ट संस्थेकडून घेण्यात येणार्या कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले. सुरक्षा रक्षक कामावर येतच नव्हते, गरज नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आली होती असे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्मार्ट संस्थेचे कर्मचारी असल्यामुळे संगणक येत असूनही महापालिकेचे कायम कर्मचारी काम करीत नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यामुळे मनसेच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह स्मार्ट संस्थेच्या कामावरून कमी केलेल्या सेविका उपस्थित होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले.