शिरपूर। शिरपूर येथील पंचायत समितीतील मग्रारोहयो कक्षातील तत्कालीन पॅनल तांत्रिक अधिकार जयंत वसंत आव्हाड यांनी 4 लाखाचा अपहार करुन अनियमितताकेल्याबद्दल त्यांच्याविरुध्द शिरपूरपोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. येथील पंचायत समितीतील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कक्षात जयंत वसंत आव्हाड हे पॅनल तांत्रिक अधिकारी या पदावर कंत्राटी तत्त्वावर 24 नोव्हेंबरते 30 एप्रिल 2016 पावेतो कार्यरत होते.
पंचायत समितीत 2016 साली कार्यरत
सदर हजेरीपटावरील रक्कम 9 मे 2016 ते21 ऑगस्ट 2016 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने या रक्कमा त्यांचे हित संबंधातील व्यक्तींचे वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आले असून त्यानंतर त्यांची लगेच एटीएमद्वारे खात्यातून रक्कमा काढून घेतल्याचे निर्देशनास आले. सदरची बाब उघडकीस आल्यानंतर आव्हाड यांनी 3 लाख 46 हजार इतक्या रक्कमेचा भरणा 8 सप्टेंबर 2016 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शिरपूर येथून जिल्हास्तरीय ईएफएमएस खात्यात अपहाराची रक्कम भरणा केली. परंतु सदर बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून व त्यात मोठ्या स्वरुपाची अनियमितता करुन अहपार केल्याचे सिध्द होत असल्याने आव्हाड हे याप्रकरणी सर्वस्वी जबाबदार आहेत. तत्कालीन तांत्रिक अधिकारी जयंत आव्हाड यांनी केलेल्या अनियमितता व अपहार प्रकरणी त्यांच्या विरोदात विस्तार अधिकारी रोहिदास ज्ञानेश्वर मेहेदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.