कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामान वेतनाच्या मागणीसाठी धरणे

0

जळगाव-कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार कर्मचारी यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार समान काम समान वेतन लागू करा. रोजंदारी कामगाराची योजना लागू करा व कामाची हमी द्या, या मागण्यांसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयटक संलग्न या वीज कामगार संघटनेतर्फे प्रलंबीत मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ठरावानुसार ३२ हजार कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार व सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी १.३० वाजता द्वारसभा घेण्यात आली. आंदोलनात जिल्हाभरातून कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार व सुरक्षा रक्षक यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

संघटनेच्यावतीने उपमुख्य औद्योगीक अधिकारी अरूण शेलकर, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, व्यवस्थापक उध्दव कडवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जयसिंग जाधव , देविदास सपकाळे, योगेश तावड़े, पांडूरंग पाटील, प्रमोद ठाकुर यांच्यासह कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.