भुसावळ। महाराष्ट्रातील कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगारांनी 22 मे पासून बेमुदन संप सुरू केला होता. त्यात दीपनगर औष्णिक वीज निर्मीती प्रकल्पातील कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. 6 जून रोजी कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगारांचे प्रतिनिधी व कार्यकारी संचालक (मानव संसाधान) यांच्या स्तरावर बैठक झाली. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांच्या अध्यक्षतेखाली 23 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.
या विषयांवर होणार विचारविनीमय
विविध चर्चेमध्ये कामगारांच्या समान काम, समान वेतन करीता नियुक्त समितीचा निर्णय लागल्यानंतर त्यावर कारवाई होईल.एन.एम.आर.पध्दत सुरू करणे किंवा ठेकेदारीवर काम करण्यार्या कर्मचार्यांना कायम करण्यासंबधी उर्जामंत्र्यांनी सुचित केलेल्या पध्दतीचा विचार होईल.कंत्राटी कामगारांचा सेवाकाळ 58 ते 60 वर्षे वया पर्यंंत राहिल. 21 मे 2017 रोजीची कंत्राटी कामगाराच्या कामगाराची स्थिती आबादित राखली जाईल.
महानिर्मिती केंद्रात महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांसाठी गृहसंकुल योजना राबविली जाईल. वितरण – पारेषण मधील कामगारांच्या रिकत जागा भरतांना कंत्राटी कामगारांना सामावुन घेणेबाबत धोरण निश्चीत करण्यात येईल.या बाबत सकारात्मक विचार आहे.त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीने विना विलंब काम बंद आंदोलन स्थगीत केले आहे.