भुसावळ : दिपनगर येथील 500 मे.वॅ.प्रकल्पात कार्यरत असलेल्या लिटिल स्टार असोसिएट कंपनीतील दोन कंत्राटी कामगार देय रक्कम न देता कामावरुन कमी केल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बालाजी महादेव पठाडे व अजय अशोक जाधव हे दोन कंत्राटी कामगार सदर कंपनीत कामास होते. या कंपनीत 1 जून 2015 ते 1 जून 2016 पर्यंत किमान वेतन, बोनससह, पी.एफ. च्या रकमेत अपहार झाल्याचा आरोप असून 7 दिवसात संपुर्ण चौकशी करुन न्याय देण्यात यावा. देय असलेली रक्कम मिळण्यासाठी या कामगारांनी विनंती पत्र दिले.
कंपनीचालकास प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप
अधिकार्यांनी देखील नमुद पैशांची भविष्यकाळात कंपनी चालकांना देण्याच्या सुचना केल्या होत्या. परंतु कंपनी चालकाने कोणत्याही प्रकारच्या रकमा न देता नियमबाह्य कामावरुन कमी करण्याचे पत्र दिले.कंपनी चालकाच्या संदर्भात कंत्राटी कामगारांच्या जनरेशन प्रशासनाकडे अनेक गंभीर तक्रार दिल्या गेल्या आहेत. प्रशासन कंपनी चालकास पाठिशी घालत आहे.कंपनीत बोनस, किमान वेतन व पी.एफच्या रकमेत झालेल्या अपहाराची 7 दिवसात चौकशी करण्यात यावी यासाठी 19 पासुन आमरण उपोषण या दोन कामगारांनी सुरू केले आहे.