कंत्राटी कामगारांचे 22 रोजी कामबंद

0

भुसावळ। कंत्राटी आऊट सोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीतर्फे सोमवार 22 रोजी पासून बेमुदत कामबंद आंदोलन राज्य पातळीवर पुकारण्यात आले आहे. आंदोेलनात सहभागी होण्यासाठी दिपनगर प्रकल्पातील 110 व 500 मेगावॅट प्रकल्पाच्या गेटवर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. 19 रोजी मुंबई येथील प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत कामगारांच्या हितासाठीच्या मागण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे बेमुदत कामबंद आंदोलनासंदर्भात द्वारसभा घेण्यात आली.

यांनी केले मार्गदर्शन
या द्वारसभेत प्रमुख वक्त कमलेश राणे, सचिन भावसार यांनी कामगारांना संबोधित केले. यशस्वीतेसाठी विक्रम चौधरी, धनराज चौधरी यांनी काम पाहिले तर आभार चंद्रा अवस्थी, केसरसिंग यांनी मानले. सुरक्षा विभागातर्फे जे.एस. कळसकर, पी.बी. झोंबाट, एन.सी चौधरी यांनी बंदोबस्त ठेवला.