आमदार महेश लांडगे; थेरगावात कामगार मेळावा उत्साहात
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मानधनावर काम करणारे व ठेकेदारांकडे काम करणार्या सर्व विभागातील कंत्राटी कर्मचार्यांना समान काम समान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री, मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी, कामगार आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
हे देखील वाचा
थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात शनिवारी कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, ज्येष्ठ कामगार नेत्या मेधा थत्ते, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजूर्डे, सल्लागार अॅड. वैशाली सरीन, आबा गोरे, मनोज माछरे, संजय कुटे, महाद्रंग वाघेरे, चारूशिला जोशी, हनुमंत लांडगे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, मुकुंद वाखारे, वैशाली वळे आदींसह कामगार उपस्थित होते.
ठेकेदारांकडून कर्मचार्यांची लूट…
मेधा थत्ते म्हणाल्या की, असंघटीत कामगारांनी एका छताखाली एकत्र यावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठेकेदारांना, कर्मचार्यांना देण्यासाठी किमान वेतन, ईएसआय, साधन, मानधनाचे पैसे देते. तरीही ठेकेदारांकडून कर्मचार्यांना पुरेसे वेतन दिले जात नाही. समान काम समान वेतन मिळण्यासाठी आपण एका संघटनेच्या छताखाली कामगारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. झिंजूर्डे यांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्व विभागातील मानधन, कंत्राटी पद्धतीने काम करणारे सुमारे चार हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांना कायम कामगारांप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे. कायम कामगारांप्रमाणे गणवेश व इतर साधने मिळावीत, आठ तासांचे काम, साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा, ओळखपत्र, ईएसआयची वैद्यकीय सेवा आदी सेवा सुविधा कायम कामगारांप्रमाणे मिळाव्यात, यासाठी महासंघ प्रयत्नशील राहिल. स्वागत मनोज माछरे यांनी, सुत्रंसचालन हनुमंत लांडगे तर आभार चारूशिला जोशी यांनी मानले.