कंपनीतील पावणे तीन लाखांचे साहित्य लंपास

0

पिंपरी-चिंचवड : कंपनीच्या वॉल कपाऊंडवरून आत प्रवेश करून चोरट्यांनी पावणे तीन लाख रूपये किंमतीचे 60 वॉल-बॉल चोरून नेले. ही घटना भोसरीतील पी. जे. वॉल्स मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीत सोमवारी (दि.6) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी कंपनी मॅनेजर सुनील पाटील (वय 45, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भोसरी, पीसीएनटीडीए प्लॉट नं.10 येथे पी. जे. वॉल्स मॅनिफॅक्चरींग प्रा. लि. कंपनी आहे. 3 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीच्या वॉल कपाऊंटवरून आतमध्ये प्रवेश केला. कंपनीतील दोन लाख 74 हजार 976 रूपये किंमतीचे 60 वॉल-बॉल कास्टींग पीस चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.