कंपनीत उंचावरून पडल्याने पिंपरीतील एकजणाचा मृत्यू

0

भोसरी : एमआयडीसी भोसरी येथे एचपीजेसी या कंपनीत उंचावर काम करत असताना तोल जाऊन कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुुपारी बारा वाजता घडली. निगाह सब्दार अली (वय 35 रा. भवानीपेठ, पिंपरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये काम करत असताना तोल जाऊन निगाह खाली पडले. यामध्ये त्यांना जबर मार लागला. उपचारासाठी त्यांना पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.