कंपनीत काम करताना महिलेच्या हाताची बोटे तुटली

0

रांजणगाव । एमआयडीसीमधील आवटे इंजिनीअरींग कंपनीत काम करताना एका महिला जखमी झाली असून तिच्या हाताची बोटे तुटल्याची घटना घडली आहे. कंपनी व्ययवस्थापनाकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदर महिलेने याबाबत रांजणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अर्चना पाटील हिरगळ असे तिचे नाव आहे.

४ ऑगस्ट २०१७ रोजी कंपनीत काम करत असताना सकाळी ११.३० च्या सुमारास अर्चना यांच्या उजव्या हाताची करंगळी व अंगठ्याच्या मधील तीन बोटे तुटली. मात्र याबाबत कंपनीने पोलिस ठाण्यात कसलीही माहिती दिली नाही. शिवाय संबंधित महिलेला कंपनी प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यासही टाळले. त्यामुळे अर्चना यांनी बुधवारी (१३ सप्टेंबर) फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी कंपनीचा मालक एकनाथ आवटे व ज्ञानेश्‍वर घोले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार तुषार पंधारे करीत आहेत.