कंपनी सेक्रेटरी परीक्षेत परेश पाटील भारतात दुसरा

0

अलिबाग: द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या परीक्षेत संपूर्ण भारतात परेश जनार्दन पाटील हा अलिबाग तालुक्यातील सुडकोली गावातील मुलगा दुसरा आला आहे. त्याने प्रशासकीय शाखेत हे यश मिळवले आहे. कोणताही क्लास न लावता अभ्यास केला तरी यश मिळते, हे खेडेगावतल्या परेशने दाखवून दिले आहे. 22 वर्षाचा परेश गावातील मुलांचे क्लास घेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालवतो.

अलिबागच्या जे.एस.एम कॉलेजमध्ये परेशने बी.कॉम पूर्ण केले. तेथील अध्यापक प्रा. उदय जोशी यांनी त्याला कंपनी सेक्रेटरीशिप परीक्षेचा मार्ग दाखवला आणि मार्गदर्शनही केले. परेशनेही अथक मेहनत घेऊन 14 तास नियमित अभ्यास केला. परीक्षेतील यशामुळे त्याच्यापुढे संधींचा खजिनाच पसरला आहे. सचिवांसाठी अत्यंत आवश्यक असलेले सूत्र सत्यं वद, धर्मं चर उद्धृत करून परेश स्वतःमधील व्यावसायिक गुणवत्ताही दाखवतो. राष्ट्रपती व राज्यपाल यांचे प्रशासन, सरकारी कंपन्या यांच्यात असलेल्या सेवा तरूणांना उपलब्ध होऊ शकतात, असे परेश सांगतो