चिबंळी : यंदा परतीच्या पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील ज्वारी, कांदा, गहु, हरभरा यासह फालेभाज्या पिकासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परंतु, हवेली तालुक्यातील तळवडे, चिखली येथील एमआयडीसी मधील कंपनीच्या ऑईल मिश्रित तसेच रहदारीचे सांडपाणी थेट इंद्रायणी नदीच्या पाण्यात सोडण्यात आल्याने पाण्यावर फेस निर्माण झाला आहे. यामुळे पिके खराब होण्याची शक्यता शेतकर्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
हे देखील वाचा
भाविकांच्या आरोग्याला धोका…
तसेच, येत्या 3 डिसेंबर रोजी कार्तिकी यात्रेनिमीत्त आळंदी येथे येणार्या भाविकांना पाण्याची सोय व्हावी, या हेतूने इंद्रायणी नदीला पाणी सोडल्याने देहू ते आळंदी पर्यंत असलेले बंधारे तुटूंब भरले आहे. तर, चिंबळी येथील बंधार्यांच्या पाण्यात पांढरा शुभ्र फेश तयार झाला असून भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासह शेतीच्या पिकावर दुषित पाण्याचा परिणाम होणार आहे. त्यातच नदीच्या पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने कंपन्यांमधील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.