जळगाव। मोकळ्या जागेत टाकलेला कचरा घरत उडून येत असल्याच्या कारणावरून तिघांनी दोन्ही तरूणींना मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास इंद्रप्रस्थनगरातील शिवशंकर कॉलनीत घडली. दरम्यान, याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
शहर पोलिसात तिघांविरूध्द तक्रार दाखल
शिव शंकर कॉलनीत जयश्री अशोक शिंदे (वय-30) ही आई-वडील, भाऊ तसेच मावशी व मावस बहिरणसोबत राहतात. शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास जयश्री ही मावस बहिण अश्वीनी हिच्यासोबत अंगणात बसलेली होती. त्यावेळी शेजारी राहणारे दिपक वाणी व त्यांची पत्नी आणि गल्लीत राहणारी बबली हे तिघे जयश्री हिच्याकडे येवून तुम्ही मोकळ्या जागेत कचरा टाकतात, तोच कचरा आमच्या घरात उडून येतो असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सगळेच ह्या ठिकाणी कचरा टाकतात असे जयश्री बोलताच तिला दिपक वाणी याने मारहाण केली. यानंतर भांडण सोडविण्यासाठी अश्वीनी हि देखील आल्याने तिला दिपक याने बाजून ढकलून दिले. व दिपक याची पत्नी रुपा व बबली यांनी नंतर जयश्री आणि अश्वीनीला बेदम मारहाण केली. त्यानंतर परिसरातील राहणार्यांनी सुरू असलेल्या भांडणात हस्तक्षेत घेत ते सोडवले. दरम्यान, जयश्री हिने घटनेची माहिती वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी शहर पोलिस स्टेशनकडे धाव घेत तिघांविरूध्द तक्रार दाखल केली असून त्यानुसार तिघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पूढील तपास परदेशी हे करीत आहेत.