हडपसर । रामटेकडी येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमधील महापालिका 13 एकर जागेवर कचरा प्रकल्पाचे काम सूर असल्याचे भासवले जात आहे. मात्र येथे कोणतेही काम सुरू नसून काम करू देणार नाही असा इशारा कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे. लवकरच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी हडपसरमध्ये हंजर बायोटेक, दिशा वेस्ट मॅनेजमेन्ट, अजिंक्य, रोकेम, जनावरे जाळण्याचा कारकस प्रकल्प, कँटोन्मेंट कचरा प्रकल्प हे प्रकल्प हडपसर परिसरात असून गेली अनेक वर्षे हडपसरचे नागरिक हा कचरा सहन करावा लागत आहे.
शहरात एकूण 1600 टन कचरा दररोज तयार होतो, त्यापैकी 100 टन कचरा हा वडगाव व बाणेर येथील कचरा प्रकल्पात जिरवला जातो व उर्वरित 1500 टन कचरा येतो आणि आणखी कचरा हडपसर परिसरात आल्यास परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो, या प्रकल्पाच्या विरोधात येथील नागरिक आहेत. दररोज या प्रकल्पाबाबत नगरसेवक योगेश ससाणे स्वतः जाऊन पाहणी करतात.
प्रकल्पात एक वीटही…
सभागृह नेते वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या छापून पुणेकर व हडपसरकरांची दिशाभूल करीत आहेत, सध्या प्रकल्पाचे कोणतेही काम सुरू नाही. ‘एक ही भूल, कमल का फूल, कर रहे है सब की दिशाभूल,’ प्रकल्पात एक वीटही येथे उभारू देणार नाही. आम्ही याचिका दाखल करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून काही दिवसांत न्यायालयात जाणार आहोत. येथील नागरिक कचरा प्रकल्पच्या विरोधात आहे. येथे प्रकल आम्ही कसल्याही प्रकारे होऊ देणार नाही.
-योगेश ससाणे,
प्रभाग समिती अध्यक्ष