ठाणे : वाढत्या लोकसंख्येसोबत अंबरनाथ, बदलापूर आणि महापालिका असलेल्या उल्हासनगर शहराचा कचराप्रश्न गंभीर बनला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने या तिन्ही शहरांचा कचरा घराघरांतून उचलून फक्त कचराभूमीवर टाकणे एवढीच प्रक्रिया केली जाते. मात्र कचराभूमीवर साचलेला कचरा, त्यात आग लागण्याचा वाढलेल्या घटना आणि आसपासच्या नागरिकांवर त्याचा झालेला परिणाम चिंताजनक आहे.