कचरा फेकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

0

पिंपरी-चिंचवड : व्यवसायातून निर्माण होणार्‍या कचरा मोकळ्या जागेवर टाकणार्‍या चिखली, कुदळवाडी येथी स्टील ट्रेडर्स यांच्याकडून ’फ’ क्षेत्रिय कार्यलयाने दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई तळवडे गावठाण येथील निघोजे पुल येथे करण्यात आली. भरारी पथकाने प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, तळवडे गावठाण येथील निघोजे पुल परिसराची पाहणी केली. त्यावेळी या परिसरामध्ये मोकळ्या जागेवर व्यवसायातून निर्माण होणारा कचरा एम.एच 09 एल 1556 या गाडीतून खाली केला जात होता. पालिकेच्या आरोग्य विभागाने ही गाड्या ताब्यात घेऊन कार्यालयात आणली. आलीया स्टील ट्रेडर्स यांचा कचरा असल्याचे पुढे आले.