कचरा फेकल्याच्या कारणावरुन मारहाण

0

धुळे । तालुक्यातील रावेर येथील रहिवासी पंढरीनाथ आनंदा कुंभार यांनी रस्त्यात फेकलेला कचरा उचलण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन 26 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास त्यांना प्रवीण सीताराम पाटील रा.रावेर, याने लाकडी दांडक्याने डाव्या हाताच्या मनगटावर वार करुन जखमी केले.

यावेळी पंढरीनाथ कुंभार यांच्या मुली रेखाबाई व प्रतिभा या दोघी भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही प्रवीण पाटील याने लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले तसेच शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंढरीनाथ कुंभार यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन प्रवीण पाटील यांच्याविरुध्द भादंवि कलम 325, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.