कचरा संकलन केंद्रासाठी जागा निश्‍चीतीबाबत आयुक्तांच्या सुचना

0

 

जळगाव – शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी 30 कोटीचा निधी मंजुर झाला असून 9 कोटीचा निधी मिळालेले आहे. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी अधिकाऱ्यांची आज बैठक घेवून कचरा संकलन केंद्रासाठी जागा निश्‍चीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपाचे आरोग्य अधिकारी, अभियंतानी या जागांची पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियाबाबत आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आढावा घेतला. बैठकीत आरोग्य अधिकारी उदय पाटील, शहर अभियंता सुनील भोळे, नगररचना विभागातील अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी उपस्थित होते. घनकचरा प्रकल्पांसाठी मनपा प्रशासनाला शहरात तीन ठिकाणी कचरा संकलन केंद्र तयार करायचे आहे. या ठिकाणी शहरातून घंटागाड्यांमध्ये कचरा संकलन केल्या नंतर या केंद्रामध्ये तो कचरा संकलित करून तो कंटेनरच्या माध्यमातुन प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेण्याचे नियोजन आहे. चार महिन्यापासुन कचरा संकलन केंद्रासाठी जागा निश्‍चित करण्याबाबत सूचना देवून देखील अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे बैठकीनंतर लगेच पाहणी करण्याची अधिकारी गेले. शिवाजी उद्यान परिसरातील जागा, पिंप्राळा, कानळदा रस्त्यावरील जुन्या सायप्रस येथील जागा, नेरी नाका स्मशान भूमीजवळील जागा या त्यापैकी तीन जागांवर कचरा संकलन केंद्र तयार करण्यात येणार आहे.