नवी दिल्ली : कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने तेल विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करण्यास पुन्हा सुरू केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 69 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईत गुरूवारी पेट्रोल 69.07 रुपये होते ते काल शुक्रवारी 74.72 रुपये इतके झाले होते. त्यानंतर आज पेट्रोल 75 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 71.20 रुपयांवरून 71.67 इतकी झाली होती. आता चेन्नईत पेट्रोलची किंमत 72 रुपये प्रति लीटर झाली आहे.
कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची किंमत 60 डॉलरच्या पुढे पोहोचली आहे. गेले काही दिवस ही किंमत 50 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या. क्रूड ऑईल महागल्याने कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यासाठी दबाव टाकायला सुरूवात केली आहे.