कजगावच्या सेंट्रल बँक शाखेचा भोंगळ कारभार

0

इंटरनेट सेवा वारंवार बंद पडत असल्याने आर्थिक व्यवहारावर परिणाम

कजगाव- भडगाव तालुक्यातील कजगाव येथेे अनेक दिवसांपासून वारंवार सुरू असलेल्या इंटनेटच्या अडचणीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कजगाव शाखेत धडक दिली. याठिकाणी शाखा व्यवस्थापकांना इंटरनेटच्या सेवेसंदर्भात निवेदन देण्यात आले.
कजगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत नेहमी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सेंट्रल बँकेच्या शाखेत परीसरातील अनेक खेड्यावरील लोकांची खाती असल्याने येथे खातेदारांचे नेहमी येणे जाणे असते. आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असतेे. त्यातच नेहमी निर्माण होणार्‍या इंटरनेट सुविधेच्या अभावामुळे व अडचणीमूळे नागरिकांमध्ये बँके विषयी मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. अनेक खेड्यावरून लोक आपली रोजंदारी बुडवून भाडे खर्चून बँकेत येतात, मात्र बँकेच्या वारंवार बंद होत असलेल्या इंटरनेटमूळे परिसरातील नागरीक नाराज होऊन परत माघारी फिरतात. त्यामुळे हातावर पोट भरणार्‍या रोजंदारीवरील लोकांची मजुरीही बुडते व भाडेही खर्च होते. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठांनी त्वरीत लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी कजगाव ग्रापंचे माजी सदस्य अनिल महाजन, भोरटेकचे जेष्ठ शेतकरी अशोक देशमुख, खाजोळा विकासोचेे माजी चेअरमन दिपक पाटील, आनंद पाटील, रवींद्र पाटील, नासिर खाटीक, विनायक जाधव, ज्ञानेश्वर पाटील, वसीम तांबोळी, अशोक महाजन, नितीन सोनवणे, सुनील महाजन, हर्षल चव्हाण, निळसिंग पाटील व कजगाव व परीसरातील अनेक ग्रामस्थ व खेड्यावरील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सेंट्रल बँकेचे कजगाव शाखा व्यवस्थापक ऋषीकेश रंजनिकर यांनि बँकेच्या वतीने निवेदन स्वीकारले

खातेदारांची नाराजी
दरम्यान कजगाव सेंट्रल बँकेच्या शाखेतील कर्मचारी खातेदारांना मोठ्या प्रमाणावर अत्यंत चुकीची वागणूक देतात. तर बँकेतील कर्मचारी वयोवृद्ध जेष्ठ नागरीकांना अरेरावेची भाषा करून त्यांचा अपमान करण्यात येतो. त्यामुळे ह्या मनमानी कारभार करण्यार्‍यावर बँक नेमकी कोणती कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे?

बँक ही जनतेच्या सुविधेसाठी आहे व जनतेच्या कामासाठीच आहे. जो कोणी बँकेतील कर्मचारी व अधिकारी खातेदारांशी चुकीच्या बद्धतीने वागत असेल त्याला समज देण्यात येईल व तरीही बदल न झाल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच इंटरनेटच्या सततच्या अडचणी बाबतीत बीएसएनलच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून अडचण सोडवण्यात येईल.
अरुण शर्मा, सेंट्रल बँक अधिकारी.

बँक कर्मचारी हे खातेदारांशी व बँकेत येणार्‍या जेष्ठ नागरीकांशी अत्यंत बेजबाबदार पणे वागतात व अत्यंत उर्मट पणाची वागणूक देतात हा मनमानी कारभार थांबवावा व सतत इंटरनेटबंद मूळे व्यवहार बंद होत असल्याने अनेकांना त्राससोसावा लागतो त्यामुळे बँकेने याकडे लक्ष द्यावे.
अनिल रघुनाथ महाजन माजी ग्रा.प.सदस्य, कजगाव

बँकेच्या सततच्या इंटरनेट बंद मुळे आमच्या सारख्या खेड्यावरील शेतकर्‍यांना विविध योजनेचे अनुदान व अनेक बँकेविषयी कामे करण्यास अडचण येते व बँकेतील कर्मचारी हे अत्यंत चुकीची वागणूक देतात त्यामुळे इंटरनेट ची अडचण दूर करावी व उर्मट कर्मचारी वर योग्य ती कारवाई करावी.
अशोक देशमुख, भोरटेक.