कजगावातील भीषण आगीत शॉप खाक

0

कजगाव । भडगाव स्टेशनरोडवरील महाराष्ट्र सुपर शॉप या मॉलला शुक्रवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सम्पूर्ण मॉल जळुन खाक झाला. 70 लाखांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमनदलाच्या तीन बंबांनी चार तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. शेजारी गोडाऊन मध्ये लावलेल्या चार चाकी वाहनास देखील याची झळ बसली बरोबर च आजूबाजू च्या घराच्या भिंती तापल्या होत्या.

सहा महिन्यापूर्वीच उद्घाटन
गेल्या 6 महिन्यापूर्वी 21 सप्टेंबर 2017 रोजी सदर मॉल चे उद्घाटन झाले होते. कजगाव सह परिसरातील सर्वात मोठे दुकान म्हणून नावा रुपास आलेल्या या सुपर शॉपच्या शटर मधुन व मोकळ्या जागेतून धुर निघत असल्याचे या रस्त्याने जाणारे विजय सोनार, समोरच राहणारे डॉ सुदेश पाटील तसेच या भागातील रखवालदार हुसेन यांना लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ शॉप मालक सादिक रशीद तांबोळी यांना माहिती कळविताच शॉप मालक सह परिवाराचे सदस्य शॉप जवळ दाखल झाले. तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीची तीव्रता इतकी होती की या शॉप चे पुढचे शटर पूर्णपणे लाल झाली होती. शेजारील घराच्या भिंती तापल्या होत्या. बाजूच्या गोडाऊन मध्ये लावलेली वसंत शेठ वाणी कारची एक बाजू यात जळाली. उपस्थितांपैकी काहींनी भडगाव, पाचोरा चाळीसगाव येथील अग्निशमन दलाला सूचना दिल्यानंतर तिघही बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र पहिल्या तिन्ही बंब च्या पाण्याने पूर्ण आग आटोक्यात न आल्याने पुन्हा गावातून सात ते आठ बंब च्या पाण्याने चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.