कजगावात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

0

चाळीसगाव । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, पंडित दीनदयाळजी उपाध्याय जयंती समारोह निमित्त श्री माताजी चॅरिटेबल ट्रस्ट, जयदीप बहुउद्देशीय संस्था, महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन स्वच्छता मधून समृद्धीकडे ‘ग्राम स्वच्छता अभियान’ कजगाव ता भडगांव येथे राबविण्यात आले. डॉ.बाबासाहेब यांना अपेक्षित असलेला भारत आता आकार घेत आहे. त्यांना आवडेल असे ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्यांना आनंद होईल, असे कार्य करण्याचा प्रयत्न केला.

पं.स. सदस्या डॉ.अर्चनाताई पाटील, डॉ.विशाल पाटील, डॉ.संजय पाटील, वसुधा पाटील, प्रतिभा साठे, विजय गायकवाड, वनिता गायकवाड, अनिस मणियार, एकनाथ अण्णा महाजन, अनिल महाजन, सर्व महिला, कजगावतील नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमपूर्वी शोभायात्रा काढून स्वच्छताचा व हागणदारी मुक्तीचा संदेश सर्वत्र देण्यात आला.