कजगाव– भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील महाराष्ट्र सुपर शॉप या दुकानाला शुक्रवारी पहाटे आग लागल्याने सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाले. सादीक शेख रशीद तांबोळी यांच्या मालकिचा हा सुपर शॉप असून रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास या भागातून जाणार्या पादचार्याचा लक्षात हा प्रकार आल्यानंतर आग विझवण्यासाठी धावपळ करण्यात आली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव येथील अग्नीशमन केंद्रांच्या तीन बंबांच्या सहाय्याने आग विझवली मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तहसीलदार सी.एम.वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली.