बारामती । गावातील अवैध धंदे, गुन्हेगारी, महिलांची छेडछाड या सर्वांवर अंकुश बसविण्यासाठी कटफळ गावात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याबरोरच एलईडी स्क्रिन ही बसविण्यात आली आहे. यावा नागरिकांना मोठा फायदा होणार असून गावही सुरक्षित राहणार आहे. ग्रामस्थांना सरकारच्या विविध योजनांची, कामांची तसेच गावातील सोयीसुविधांबाबत माहिती मिळावी यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आली आहे, असे सरपंच डॉ. किर्ती संजय मोकाशी यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले.
या योजनांच्या शुभारंभाप्रसंगी सतिश बोरावके, पापाबाई तांबोळी सुनिता मदने, नंदा सकट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्टवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे, मार्केट कमिटीचे संचालक वसंत गावडे, उपसरपंच कांतिलाल माकर, मुकींद मदने, उमेश लोखंडे, संजय मोकाशी, बबन कांबळे, लक्ष्मण झगडे, शरद कांबळे, रेखा आटोळे, सुजाता गावडे, कस्तुरा कांबळे, उमेश लोखंडे, ग्रामसेवक सतिश बोरावके, संजय मोरे, तानाजी मोकाशी, मानिक मोकाशी, महेंद्र मदने, मोहन मोकाशी, संग्राम मोकाशी, बाळासाहेब आटोळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.