भुसावळ:- जम्मू काश्मिरातील कठुओ येथे नऊ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शहरातील स्वराज्य सेना ग्रुपतर्फे सोमवारी सायंकाळी निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ कॅण्डल जाळून या प्रकाराचा निषेध नोंदवला. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, विद्यार्थी प्रशांत बागले, विवेक पोटदूखे, अनुराग शर्मा, देवेंद्र पाटील, चित्रसेन राऊत, पूजा अंगळे, तेजस्विनी झटके, कामाक्षी बागले, सलोनी टेमाणी आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.