कठुआ येथील बालिकेवरील अत्याचाराचा निषेध

0

पाचोरा। जम्मू काश्मीर राज्यातील कठूआ गावातील 8 वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली. नराधमांनी शाररीक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली. ह्या दुर्देवी घटनेचा पाचोरा तालुका शिवसेना अल्पसंख्याक सेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. पाचोरा पोलीसांना याबाबत निवेदन देण्यात आले. भारत देशामध्ये स्त्रीशक्तीला खूप मोठे आदराचे स्थान आहे. माता-भगिनी म्हणून वंदन पूजन केले जाते. स्त्री ही आईच्या रूपाने संपूर्ण विश्‍वाची जन्मदायी आहे. समाजातील अत्यंत दृष्ट प्रवृत्तीचे वासनांध राक्षसशक्ती सतत मातृत्व शक्तीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करतात. ही बाब अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. ह्या दृष्ट शक्तीचा बिमोड झालाच पाहिजे. यांना भरचौकात देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात कुणीही नराधम भगिनीकडे वाईट नजरेने बघण्याची हिम्मत करणार नाही. भाजपा सरकारचा वचक ह्या समाजकंटकावर नाही. त्यांना पाठीशी घालतात. सरकारच्या बोटचेपी धोरणाचा आम्ही धिक्कार करीत आहोत. अत्याचारविरोधात जलदगतीने न्यायालयीन निकाल लावून त्यांना कठोर देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे. लवकरात लवकर निकाल न लावल्यास शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

 

यावेळी जावेद शेख युसुफ शेख शिवसेना अल्पसंख्याक, उपजिल्हाप्रमुख जळगाव, फारूक पिंजारी, फरीदखान, अमजद खान, मुशीरखान, शे.मोहसीन, शे.जावेद, विजय भोई, अनिस खान, चंदू मोरे, शमीरखान, रमजान टकारी, बिलाल पटेल, समीर पटेल, रेहान शेख, शे.शाही हुसेन, अरबाज पिंजारी आदी शिवसेना अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.