बोदवड महाविद्यालयात ‘मी पी.एस.आय.कसा झालो’ विषयावर व्याख्यान
बोदवड- स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे जीवन समृध्द करणारा अनुभव असतो. मेहनतीचे अवजार वापरल्यास जीवनाच्या करीअरची ईमारत मोठ-मोठ्या वारा-वादळांसमोर डगमगणार नाही, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे जेलर आणि अधीक्षक जितेंद्र माळी यांनी येथे केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी समुपदेशन सेलतर्फे ‘मी पी.एस.आय. कसा झालो’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद चौधरी होते. उपप्राचार्य डी.एस.पाटील, डॉ.प्रकाश पाटील, डॉ.रुपेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर विद्यार्थी कुठल्याही संघर्षाला देऊ शकतात तोंड
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उपनिरीक्षक झालेले आणि बोदवड कॉलेजचे माजी विद्यार्थी जितेंद्र माळी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे चरीत्र अभ्यासल्यास विद्यार्थी फक्त स्पर्धा परीक्षेंलाच नव्हे तर जीवनातील कुठल्याही संघर्षाला सहज तोंड देऊ शकतील . बोदवड महाविद्यालयात ते शिकण्यासाठी रोज आपल्या गावावरून 7 ते 8 किलोमीटर पायी येत असल्याचे त म्हणाले. महाविद्यालयात येतांना शेलवड ते बोदवड रनिंग करत येत होतो म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मारत होता. रनिंग पण व्हायची आणि शाळेत पण यायचे म्हणजे पैसे पण वाचायचे. डॉ.बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि ते प्राशन केल्याने माणूस गुरगुरतो.
यांनी घेतले परीश्रम
प्रास्ताविक डॉ.प्रभाकर महाले यांनी तर सूत्रसंचालन अतुल इंदोरे, राजश्री मेतकर यांनी केले. आभार अजय बोदडे यांनी मानले. प्रा.कांचन दमाडे,योगेश राजपूत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.