कडकडे डफावर थाप, तू शोषितांचा मायबाप !

0

जळगाव । स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीमत्व, साहित्यिक, कवी, विचारवंत लोकशाही अण्णाभाऊ साठे व सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्याच्या ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालय, कॉलेज आदि ठिकाणी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तर काही शाळांमध्ये चिमुकल्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळकांच्या वेषभूषेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

साठे नगरात लोकशाहिरांना अभिवादन
चाळीसगाव । शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती चाळीसगाव येथील आण्णाभाऊ साठे नगर येथे मंगळवार 1 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ए.बी. हायस्कूल समोरील आण्णाभाऊ साठे नगर येथे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या प्रतिमेचे पुजन माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीवदादा देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक रामचंद्र जाधव, विश्वास चव्हाण, शेखर देशमुख, शाम देशमुख, जगदीश चौधरी, पत्रकार मोतीलाल अहिरे, फकीरा बेग, दिपक सुर्यवंशी, अशोक महाले, वसंत मरसाळे, दिपक मरसाळे, किरण अहिरे, रविंद्र भिसे, श्रावण पाखरे, महेंद्र मरसाळे तसेच समाजबांधव उपस्थित होते. तर नगरसेवक आनंद खरात, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, बेलगंगा सहकार साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, भाजपा जेष्ठ नेते वाडीलाल राठोड, वसंत चंद्रात्रे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पत्रकार मोतीलाल अहिरे, नगरसेविका संगीताताई गवळी, वसंतराव मळसाळे अशोक महाले यांच्या सह मान्यवर उपस्थितही महान पुरूषांना अभिवादन कार्यक्रम करण्यात आला.

देवळी आश्रमशाळा
चाळीसगाव । तालुक्यातील देवळी येथे उत्तमराव पाटील आदीवासी आश्रमशाळा येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतीथी निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जितेंद्र सुर्यवंशी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतिष पाटील यांनी प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सचिन पाटील यांनी मानले.

चोपडा येथे नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांच्याहस्ते माल्यार्पण
चोपडा । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97व्या जयंती नगर परीषदेच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांचेहस्ते माल्यार्पण करण्यात आले. मातंग समाजबाधंव सालाबादा प्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळा 1992 पासुन जुन्या इमारतीतच ठेवण्यात आलेला आहे हा पुतळा सार्वजनिक जागेवर बसविण्यात यावा, अशी मागणी यावेळी जयंती निमित्तान जमलेल्या मातंग समाज बांधवानी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जिवन चौधरी यांनी सांगितले की,आम्ही तुमच्या सोबत आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा सार्वजनिक जागेवर बसविण्याची शासन परवानगी देत नसल्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे, तरी देखील आम्ही नगर पालीकेचा माध्यमातून शासन दरबारी याचा पाठपुरावा करून सार्वजनिक जागेवर बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित समाज बाधंवांना सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेविका दिपाली चौधरी, सरला शिरसाठ, विमलबाई साळुंखे, अश्विनि गुजराथी, न.प.गटनेते जिवन चौधरी, नगरसेवक डॉ.रविंद्र पाटील , रमेश शिंदे, राजाराम पाटील, गजेंद्र जैसवाल, न.पा. कर्मचारी रविंद्र जाधव, महेंद्र पाटील, अनिल चौधरी, जगदीश लाड, प्रताप बाविस्कर, सचिन गवाद्दी, वसंत धनगर, बी.एन. पवार, शाम पाठक तसेच मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अ‍ॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल
अमळनेर । येथील अ‍ॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सचिव प्रा.श्याम पाटील, प्राचार्य श्रुतीरंजन बारीक, प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी हर्षल धोत्रे या विद्यार्थ्यांने दोन्ही महापुरुषांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले व पुष्कर पाटील या चिमुकल्याने लोकमान्य टिळकांची वेशभूषा परीधान करुन लक्ष वेधले होते.येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मंगरूळ संचलित अनिल पाटील प्राथमिक शाळा गांधलीपुरा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद ठाकरे हे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक भरत पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या तर अमोल पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण तर आभार प्रवीण तेले यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी हि मनोगत व्यक्त करून दोन्ही मान्यवरांच्या जीवन व कार्याविषयी माहिती सांगितली.

बालविकास मंदीरात चिमुकल्यांचे कौतूक
अमळनेर । येथील कै. अरुणाबाई गुलाबराव पाटील बालविकास मंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांचा पेहराव करून आलेला चिमुकला तनिष्क शांताराम बोरसे याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व भूमिका साकारली. मुख्याध्यापिका रुपाली वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात तहसील कार्यलयातील श्रीमती राणे बालविकास विद्यामंदिराच्या बालकांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्र संचलनज्योती सोनार मॅडम यांनी केले. आभार तेजस्विनी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यांनी शिक्षिका सहभाग घेतला.

भातखंडे विद्यालयात कार्यक्रम

भातखंडे । येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर आनांभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गुलाबराव वामनराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अशोक बाबूलाल पाटील, सदस्य अरुण रामचंद्र पाटील हे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी आपली मनोगत व्यक्त केली. शाळेचे मुख्याध्यापक जी.जे.पाटील, आय.जे.पाटील, एन.यु. देसले यांच्यासह शिक्षक वृद व कर्मचारी उपस्थित होते.