जळगाव : तालुक्यातील नशिराबादजवळील कडगाव येथील विवाहितेचा नवीन दुचाकी घेण्यासाठी 50 हजार रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. पतीसह सासू सासर्यांविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील कडगाव येथील माहेर असलेल्या खुशबू जितेंद्र धनगर (23) यांचा विवाह जितेंद्र विठ्ठल धनगर (बुधगाव, ता.चोपडा) यांच्याशी 30 एप्रिल रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून पती जितेंद्र धनगर याने विवाहितेला माहेरहून नवीन दुचाकी घेण्यासाठी 50 हजार रुपये आणावेत म्हणून तगादा लावला होता परंतु पैश्यांची पूर्तता न केल्याने विवाहितेचा मानसिक व शारीरीक छळ करण्यात आला. विवाहितेच्या आई-वडीलांना मारहाण करून जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी कडगाव येथे निघून आल्या. याबाबत 14 फेब्रुवारी त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती जितेंद्र विठ्ठल धनगर, सासरे विठ्ठल निंबा धनगर, सासू उषाबाई विठ्ठल धनगर (सर्व रा.बुधगाव, ता.चोपडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल कण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.