कडगाव वि.का.सो.संचालकपदी सुहास सपकाळे

0

जळगाव । कडगाव वि.का.सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संचालक पदासाठी 13 संचालकांची निवड करण्यात येणार होती. त्यापैकी 12 सदस्य हे बिनविरोध निवडूण आले. फक्त अनुसूचित जमातीच्या राखीव जागेच्या एका जागेसाठी नुकतीच निवडणुक घेण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूमामा भोळे, सुधीर यशवंत कोल्हे, अरविंद मिठालाल पाटील, रोहिदास विष्णू पाटील, अर्जून मंगा पाटील, वसंत दयाराम पाटील, अतुल जगन्नाथ पाटील, शिवराम श्रावण पाटील, प्रकाश तुकाराम पाटील, भास्कर अंकात सपकाळे हे बिनविरोध निवडून आले. तर महिला राखीव जागेसाठी सौ. मिनाक्षी हेमराज पाटील व सौ. छाया अशोक पाटील ह्या महिला सदस्य देखील बिनविरोध निवडून आल्या. फक्त अनुसूचित जमातीसाठी सदरची निवडणूक झाली. त्यात सुहास कडू सपकाळे हे 186 मते घेवून विजयी झाले.