कडाक्याच्या थंडीत रोटरी मेट्रोचे ब्लँकेट वाटप

0

धुळे : शहरात थंडीचा कडाका वाढला असून पारा सहा अंशापर्यंत गेल्याने येथील रोटरी क्लब ऑफ धुळे मेट्रो या संस्थेने तातडीने निर्णय घेवून उघड्यावर व रस्त्यावर झोपणार्‍या पन्नास गरीबांना ब्लँकेटचे वाटप केले. शहरात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उघड्यावर राहणारे, रस्त्याच्या कडेला राहणारे, बस स्थानकात राहणारे गरीब, गरजूंचे फार हाल होत आहेत. मिळेल ते फाटके तुटके पांघरुन घेवून ते थंडीचा सामना करीत होते. ही बाब लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ मेट्रोने बैठक घेवून अशा लोकांना ब्लँकेट वाटपाचा निर्णय घेतला.

त्या अनुसार बुधवारी रात्री क्लबच्या सदस्यांनी धुळे बस स्टॅन्ड, मालेगाव रोड, चाळीसगाव रोड, पुलाखाली, नदीकिनारी व अन्यत्र जावून थंडीत कुडकुडणार्‍या लोकांना ब्लँकेट वाटप केले. यात संदिप अग्रवाल, झेशल शहा, संदीप लंगडे, अमित शहा, जितेंद्र अग्रवाल, संतोष पिंगळे यांनी साह्य केले. यावेळी प्रकल्प प्रमुख संदीप लगडे, अध्यक्ष आकाश अग्रवाल, सचिव मंजूल शहा, पवन अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, निखील जुनागडे, तुषार बेदमुथा, मनिष धुंडियाल, मयुर वाघ, निलेश उपाध्ये आदी उपस्थित होते.