कडाक्याच्या थंडीत हरियाणा, दिल्लीत मुसळधार पाऊस !

0

नवी दिल्ली-हरियाणा, पंजाब, दिल्ली या राज्यात थंडीचा जोर कायम आहे. दरम्यान आज दिल्लीत तसेच हरियाणात कडाक्याच्या थंडीत मुसळधार पाऊस झाला. कडाक्याच्या थंडीमुळे हैराण असलेल्या दिल्लीकरांना आणखी हुडहुडी भरणार आहे. हरियाणातील गुरूग्राममध्ये जोरदार गारपीठ झाली आहे.