लोहारा – गेल्या पंधरवाड्यापासून परिसरातील कडु निंबाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात आळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने झाडांचा पाला अक्षरशः आळ्यानी खाउन टाकला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सर्वच निंबाच्या झाडांची अशी अवस्था झालेली आहे. या आळ्याचा उपद्रव निंबाच्या झाडासह दुसऱ्या कोणत्याही झाडाना नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे तसेच चिंताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक झाडांवर हजारो हिरव्या रंगाच्या आळ्या दिसून येत आहेत. या आळ्या आता कापसा बरोबर शेतकऱ्याच्या घरापर्यंत येत असल्याने भीती देखील निर्माण झाली आहे.