कत्तलीचा डाव उधळला : पाल पोलिसांनी केली 13 गुरांची सुटका

रावेर : पशुधनाला कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर ट्रक रावेर पोलिसांनी पाल गावानजीक जप्त करीत 13 गुरांची सुटका केल्याने प्राणीमित्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशय आल्यानंतर पोलिसांची कारवाई
सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कत्तलीच्या उद्देशाने आयशर ट्रक (क्रमांक यु.पी.83 बी.टी.8021) हा भरधाव वेगाने निघाला असताना पाल पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गुरांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक होत असल्याने दिसून आले. पोलिसांनी दहा गायींसह तीन वासरू जिवंत वासरांची सुटका केली तर दोन वासरू मयत स्थितीत आढळले. सर्व पशूधन गो शाळेत रवाना करण्यात आले. पोलिसांनी सहा लाखांच्या आयशर ट्रक जप्त केला. या प्रकरणी प्रमोदकुमार छोटेलाल (रा.कोटला, उत्तरप्रदेश), गुड्डू मुन्नेलाल खान (नलामीकिनी, जि.येटा, अखिलेश सोदाशीह (गोदाऊ, उत्तरप्रदेश) याच्याविरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार महेबूब तडवी, नाईक कल्पेश अमोदकर करीत आहे.