भुसावळ- शहरातील मिल्लतनगरात बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या 95 गुरांची तेथून सुटका केली होती तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयीत मोहंमद सईदला अटक केली होती. आरोपीच्या घराची रविवारी झडती घेतली असता जनावरांच्या 63 कातडी जप्त करण्यात आल्या. त्या कातडींचा काही भाग काढून तो तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविला जाणार आहे. पोलिसांनी कातड्यांचा नमुना घेत उर्वरित कातड्यांची विल्हेवाट लावत त्यांना मंगळवारी जमिनीत पुरले. या गुन्ह्यातील चार आरोपी पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे शिवाय ईतक्या मोठ्या प्रमाणावर गुरे कोठून आणली, यापूर्वीही आणली आहे का, या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहे, याची माहिती काढण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.