रावेर : कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक होत असताना पोलिसांनी भातखेडा गावाजवळ ट्रक अडवला असता पोलिसांनी पाहताच चालकासह क्लीनर पसार झाला. ट्रकमधील 19 गायींसह 33 जिवंत गोर्ह्यांची सुटका करण्यात आली तर दोन गायींसह 9 गोर्हे मात्र मृत स्थितीत आढळले. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेर पोलिसात गुन्हा दाखल
भातखेडा गावाजवळ ट्रक (आर.जे.52 जी.ए.5416) ची पोलिसांनी तपासणी केली असता त्या 19 गायी व 33 गोर्हे जिवंत आढळले तर दोन गायी आणि 9 गोर्हे मृतावस्थेत आढळले. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या वाजेच्या सुमारास हा ट्रक रावेर पोलिसांनी जप्त केला मात्र जप्तीची कारवाई होत असतांना ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर मात्र पसार झाला. रावेर पोलीस स्थानकामध्ये कॉन्स्टेबल उमेश रमेश नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचा मालक आणि चालकाविरूध्द विविध कलमान्वये एएसआय शेख इस्माइल यांनी गुन्हा नोंदवून घेतला. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत. तपासी हवालदार सतीश सानप करीत आहेत.