चाळीसगाव : गुरांची अत्यंत निर्दयतेने व कोंबून वाहतूक केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार गुरांची सुटका करीत वाहन जप्त केले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बारी येथील शाळेच्या जवळून निर्दयतेने चार बैलांची वाहतूक वाहनातून होत असल्याची गोपनीय माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवार, 1 जुलै रोजी कारवाई करत सायंकाळी पाच वाजता वाहन (एम.एच.15 एफ.व्ही. 141) जप्त करीत चालकाला गुरे वाहतूक परवाना विचारला असता तो न दिल्याने पोलिसांनी चारही बैलांची सुटका करीत वाहन जप्त केले.
दोघांविरोधात गुन्हा
याबाबत विकास सुधाकर गोमसाळे (साक्री रोड, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश महारू चौधरी (रा.मेहुणबारे, ता.चाळीसगाव) आणि अमजद खान खालक खान कुरेशी (रा.चौधरीवाडा, चाळीसगाव) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक प्रतापसिंग मथुरे करीत आहे.