चाळीसगाव – तालुक्यातील वाघडु शिवारातील शेतातुन २ आयशर वाहनात कोंबुन कत्तलीसाठी ४० बैल व २ वासरे घेवुन जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना दोन आयशर सह ताब्यात घेतले होते त्यातील दोघे जण फरार होते त्यातील दोघांना आज दिनांक ३ रोजी पोलीसांनी अटक केली असुन न्यायालयात हजर केले असता चौघा आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील वाघडु शिवारातील शेतात कत्तलीसाठी घेवुन जाण्यासाठी तयारीत असलेल्या ईब्राहीम खान (४२), अकबर खान हमीद खान (२७) दोघे रा रथगल्ली चाळीसगाव या दोघा आरोपींना ४० बैल व दोन वासरींसह चाळीसगाव शहर पोलीसांनी ताब्यात घेतले होते या गुन्ह्यातील २ वाहन चालक आरोपी फरार झाले होते त्यातील फरार चालक आरोपी जनाव खान ईस्माईल खान (५०) रा रे बां चाळीसगाव व अकील शेख शमशोद्दीन (३०) रा धुन व गा चाळीसगाव यांना
आज ३ रोजी सकाळी ११-३५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे
एवढ्या मोठ्या प्रमाणावर ४० बैल व दोन वासरे कत्तलीसाठी नेत असल्याने ही जनावरे त्यांच्या कडे आली कुठुन ती खरेदी केली होती अथवा चोरीची होती याचा तपास करण्यासाठी चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन यादरम्यान याचा उलगडा होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.