कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या कन्टेनरमधील 25 बैलांची सुटका

0

जळगाव – चिंचोलीकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये विना परवाना 25 बैलांना दाटीवाटीने करून कोंबुन कत्तलीसाठी नेत असल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात विनापरवाना मुक्या प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर 25 बैलांची सुटका करून कुसुंबा गौशाळेच्या ताब्यात देण्यात आले आहे.  कन्टेनर चालक अब्दुल कलीम रज्जाक (वय-37) आणि क्लिनर इसाम मोहम्मद हानिफ (वय-24) दोन्ही रा. मनेली .जि.बिदर राज्य (कर्नाटक) यांना नागरीकांनी मारहाण करत एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले. कन्टेनरची आडवणूक करून नागरीकांना एकच गोंधळ घातला होता. कन्टेनरमधील कोंबून भरलेले सर्व बैलांना खाली उतरवून कुसुंबा ता.जळगाव येथील गौशाळेच्या ताब्यात देण्यात आले आहे.  यावेळी सदरील 25 बैले ही जळगाव शहरातील गुरांचे बाजारातून घेत हल्दी जि. परभणी येथे कत्तलीसाठी नेत असल्याचे कबुल केले. याबाबत कुठलाही परवाना नसतांना सर्व बैलांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी पो.कॉ. समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय पाटील हे करीत आहे.