‘कथकोत्सवा’त २८० नृत्यांगनांचे सादरीकरण

0

तेजस्विनी साठे व त्यांच्या गुरू ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनिषा साठे यांचे एकत्रित नृत्य

पुणे । गुरू आणि शिष्य यांचा एकत्रित कथक नृत्याविष्कार पाहण्याची संधी शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक संस्थेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त सादर होणार्‍या ‘कथकोत्सव २०१७’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. सहसंचालिका तेजस्विनी साठे आणि त्यांच्या गुरू ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनिषा साठे यांचे एकत्रित नृत्यसादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तेजस्विनी साठे यांच्या २८० शिष्यादेखील कला सादर करतील.

संस्थेतील विद्यार्थिनींना आपली कला रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गुरुवारी (दि.२८) सायंकाळी साडेपाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुरलीधर मोहोळ, अनिल शिदोरे, प्रवीण भोळे, शारंगधर साठे आदी उपस्थित राहणार आहेत.