कथाकथनातून उलगडली कचरा समस्या

0

पुणे । पुणे- कचरा समस्या हा शहरातील अतिशय गंभीर प्रश्‍न झाला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा अनेक गोष्टी आपल्याकडून घडत असतात. रस्त्यावर टाकलेला एखादा कागदाचा कपटा देखील कचरा वाढवू शकतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. स्वच्छतेच्या छोट्या-छोट्या गोष्टींचे पालन केले तरी कचजयासंदर्भात अनेक प्रश्‍न सुटतील. शहराला पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन होणे अतिशय गरजेचे आहे. शहरातील या अतिशय गंभीर बनत असलेल्या कचरा समस्येचे गांभीर्य कथाकथन, नृत्य व परिसंवादातून उलगडले.सूत्रधारतर्फे भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी कचरा समस्येविषयी टॉक शोचे आयोजन मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, उत्कर्षा दगडे,वैष्णवी निंबाळकर यांनी कचरा समस्या आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नृत्यातून उलगडले सांगितले.

कचर्‍याचे व्यवस्थापन गरजेचे
वरुण मुखर्जी म्हणाले, सोसायटीमधील प्रत्येकाने कचर्‍याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करायला पाहिजे हे शिकणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही प्रशिक्षण कार्यशाळेचे देखील आयोजन करतो. प्रत्येकाने घरातील कचरा वेगळा करणे ही आपली जबाबदारी आहे, तो ओला, सुका कचरा वेगवेगळा केल्यास कचर्‍याचा प्रश्‍न नक्कीच सुटेल.

पर्यावरणाला हानी पोहोचते
अनुजा पित्रे म्हणाल्या, समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कचर्‍याचा प्रश्‍न खूप मोठा आहे, असे लक्षात आले. यासाठी एकत्र काम करण्याचा विचार करून आम्ही वेगवेगळ्या विषयांशी निगडीत असलेले तिघेजण एकत्र आलो. बाजारातून आपण प्लॅस्टिकच्या पाण्याचा बाटल्या विकत घेतो. त्या बाटल्यांवर जी एक्सपायरी डेट असते ती त्या बाटलीसाठी असते. अनेकजण अशा बाटल्यांमध्ये पुन्हा पाणी भरून त्या वापरतात. अशा बाटलीतून पाणी प्यायल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होतीलच परंतु पर्यावरणाला देखील मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते.