मुंबई-आमदार राम कदम यांनी मुलीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उमटत आहे. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री आहे. कारवाई करण्याचे माझ्या हातात नाही. जर राम कदम दोषी आढळल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल. असे वक्तव्य विनोद तावडे यांनी केले आहे.
@BJP4Maharashtra च्या विलासी रामाच्या वक्तव्यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री @TawdeVinod यांना घेराव घालून विचारला जाब @NCPspeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @ANI pic.twitter.com/GEW59bPw99
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 5, 2018
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांनी आज बुधवारी विनोद तावडे यांना राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा घेराव घालून जाब विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. महादेव जानकर आणि विनोद तावडे यांना घेराव घालून या वक्तव्यचे स्पष्टीकरण मागितले. ‘राज्यातील मखलाशी बंद करा व असल्या विकृतीला तातडीने हाकलून द्या’ अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या उत्सवात महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राम कदम यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.’आम्ही जिजाऊच्या लेकी, पळवुन दाखवा, राम कदमांचा चौरंग करु’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.