तुझ्याकडे खरोखरची देसी गर्ल आहे; शाहिद कपूरचा निकला सल्ला

0

मुंबई : प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच निक जोनासची पत्नी झाली. जोधपूरमधील उमेद भवन येथे हा यांचा विवाहसोहळा पार पडला. निकसोबतच्या विवाहाआधी प्रियांका शाहिदसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

नुकतंच शाहिदने कॉफी विथ करणच्या एका भागात हजेरी लावली होती. यावेळी करणने याच पार्श्वभूमीवर तु निकला काय सल्ला देशील? असा प्रश्न त्याला विचारला. यावर उत्तर देत शाहिद म्हणाला, मी निकला एवढंच सांगले की कधीच मागे वळून पाहू नकोस. तुझ्याकडे खरोखरची देसी गर्ल आहे.