माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचा आमदार चिमणराव पाटील यांना टोला
एरंडोल :आतापर्यंत राजकारण करीत असताना कधीही श्रेयाची लढाई केली नाही. दुसर्याने केलेल्या कामांची फित कापण्यापेक्षा कधी आपण स्वतः केलेल्या कामांची फित कापावी असा टोला राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांना लगावला आहे. माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी आज एरंडोल येथील नूतन पोलीस स्थानकाच्या नारळ फोडून उद्घाटन केले. यावेळी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,राष्ट्रवादीचे नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,जिल्हा सरचिटणीस अमित पाटील,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,उपस्थित होते.