कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

0

विक्रमगड । छत्रपती शिक्षण संस्था कल्याण संचालित विक्रमगड कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण व नवीन वास्तूचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. छत्रपती शिक्षण संस्था कल्याण यांनी ग्रामीण आदिवासी व बहुजन समाजाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने सन 1964 साली विक्रमगड येथे 5 ते10 पर्यंत माध्यमिक शाळा काढली.

सन 1992 साली कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे उदघाटन व नामकरण समाजसेवक रामेश्‍वरजी काबरा यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी पालघरचे पालकमंत्री विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा व संस्थेचे अध्यक्ष डॉ. नं. त्री. जोशी, कार्याध्यक्ष ना. के. फडके, ग्रामस्थ, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.