भुसावळ : महाराष्ट्र राज्य महासंघाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी 26 रोजी शासनाच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन आपल्या घरी बसूनच शांततेत निष्ठेने व प्रामाणिकपणे यशस्वी केले. जळगाव जिल्ह्यातून जवळपास दोन हजारावर प्राध्यापक बंधू भगिनींनी आपला सहभाग नोंदवला. राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाही. काही समस्यांच्या बाबतीत निर्णय घेऊन देखील अंमलबजावणी केली नाही. गेल्या 20 वर्षाांपासून विनाअनुदान तत्त्वावर काम करणार्या कनिष्ठ प्राध्यापकांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने विधीमंडळात घेतला असतानाही अर्थसंकल्पात तरतूद करून देखील 20 टक्के अनुदानाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. राज्यात जवळपास 10 ते 12 हजार कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक उपाशीपोटी विनावेतन काम करीत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे कोरोना संकटामुळे सर्व राज्य घेरले असून अशा परीस्थितीची जाणीव असतांना देखील प्राध्यापकांवरती उपासमारीची वेळ आली तर ते आत्मबलिदान करतील व शिक्षकांवर ही वेळ येऊ नये म्हणून शासनाला 20 टक्के अनुदान देण्याचा तात्काळ निर्णय घ्यावा म्हणून हे एक दिवशीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना ई मेलद्वारे दिले मागण्यांचे निवेन
पायाभूत पदांना मंजुरी देणे, माहिती-तंत्रज्ञान विषयाला अनुदान देणे, 2012 नंतरच्या नियुक्त शिक्षकांना मान्यता देणे, कोरोना पार्श्वभूमीवर कार्यरत शिक्षकांना संरक्षण किंवा विमा संरक्षण देणे अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, सचिव प्रा.नंदन वळींकार, कार्याध्यक्ष प्रा. सुनील सोनार व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांच्या स्वाक्षरीने ई मेलद्वारे देण्यात आले.