कन्नड घाटात कंटेनर दरीत कोसळल्याने जळुन खाक

0

* सुदैवाने जिवीत हानी नाही
* चालकाचा सुटला कंटेनरवरील ताबा
चाळीसगाव – औरंगाबादकडुन चाळीसगावकडे येणारा डाक पार्सलचा कंटेनर चालकाचा तोल सुटुन कन्नड घाटात मेणबत्ती पॉइंटजवळ जय मल्हारकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ खोल दरीत पडुन जळुन खाक झाल्याची घटना गुरूवारी ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली असुन सुदैवाने चालक व क्लिनरने उड्या मारल्याने जिवीत हानी झाली नसल्याची माहिती सुत्रांनी वर्तविली आहे.

पोलीसांची घटनास्थळी धाव
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास औरंगाबादकडुन चाळीसगावकडे येणारा डाक पार्सलच्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कन्नड घाटातील मेणबत्ती पॉइंटच्यापुढे जय मल्हारकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ ५०० ते ६०० मिटर खोल दरीत कंटेनर कोसळुन त्यास आग लागली मात्र सुदैवाने चालक व क्लिनर यांनी उड्या मारल्याने जिवीत हानी झाली नाही. त्याचवेळी कन्नड घाटात महामार्ग पोलीस केंद्राचे सपोनि सुभाष ठाकूर, हवालदार संजय गोसावी, हेमराज चव्हाण, विकास चव्हाण, पो कॉ रिहान खान हे शासकीय वाहनातुन गस्त घालत होते. त्यावेळी एक अज्ञात वाहन चालकाने त्यांना माहिती दिली की, कन्नड घाटात डाक पार्सलचा कंटेनर दरीत कोसळला व त्याने पेट घेतला चालक व क्लिनर हे तेथुन निघुन गेले अशी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर जावुन पाहणी केली.