* सुदैवाने जीवीत हानी नाही
चाळीसगाव । चाळीसगाव औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटात गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 5 ते 6 छोट्या दरडी रात्रीच्या सुमारास कोसळल्या असुन रात्री वाहतुक जवळपास बंद झाली होती. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. सकाळी थोड्याफार प्रमाणात वाहतुक जाम झाली होती, मात्र महामार्ग पोलीसांनी रस्त्यावरील दगड बाजुला करुन वाहतुक सुरळीत केली. कन्नड घाट सध्या मृत्यूचा सापळा झाला आहे. कोणत्या क्षणी कुठली दरड कोसळेल याचा भरवसा नाही. पावासाळ्याचे दिवस असल्याने वाहन चालकांना आपला जिव मुठीत धरुन चालावे लागते. 16 ऑगस्ट रोजी चाळीसगाव तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे कन्नड घाटात जवळपास 5 ते 6 ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या आहेत. सुदैवाने रात्रीच्या वेळी या दरडी कोसळल्याने कुठलीही मोठी हानी झाली नाही मात्र घाटात ठीक ठिकाणी दरडीचे दगड ठिसूळ झाले असल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या दरडी कोसळल्याने कन्नड घाटात सकाळच्या सुमारास काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन घाटातील दगड हटवुन रस्ता मोकळा केला व वाहतुक सुरळीत केली.
Prev Post
Next Post