कन्नड घाटात दुचाकीला अपघात : महिलेचा जागीच मृत्यू

चाळीसगाव : कन्नड घाटात झालेल्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली. शनिवारी सायंकाळी हा अपघात घडला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सविता देवचंद राठोड (33 सीतानाईक तांडा, कोलवाडी, ता.कन्नड) असे ठार विवाहितेचे नाव आहे.

दुचाकी अपघातात विवाहिता ठार
चाळीसगावहून कन्नडकडे जाणार्‍या एका दुचाकीला कन्नड घाटात शनिवार, 4 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात सविता देवचंद राठोड (33, सीतानाईक तांडा, कोलवाडी, ता.कन्नड) या विवाहितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच तिचा दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलिस नाईक भगवान माळी करीत आहे.