कन्येच्या विवाहानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत

0

नंदुरबार । विवाहात अनेक वेळी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. तसाच काहीसा प्रत्यय नंदुरबारातील एका विवाह सोहळ्यात आला. वधूच्या पित्याने या समारंभात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत दिली. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे ही मदत सोपविली असून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत
आहे.

अडीच हजार रूपयांची मदत
मुळचे आसाणे येथील व सध्या नंदुरबारात वास्तव्यास असणारे हेमंत दगडू महाले यांच्या कन्येचा विवाह नुकताच नंदुरबारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पार पडला. हा विवाह सोहळ्यात सामाजिक जाणीवेतून त्यांनी एक अविस्मरणीय सोहळा ठरविला. ज्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजू, गरिबांना, आपदग्रस्तांना मदत मिळते. त्या मुख्यमंत्री सहायता निधीस हेमंत महाले यांनी आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त अडीच हजार रूपयांची मदत दिली. विवाहाला उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. एम. कलशेट्टी यांच्याकडे हेमंत महाले व मुलाचे वडिल शरद बच्छाव यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मदतीसाठी दात्यांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी केले.